व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –शहराच्या विविध भागातील 130 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज दि.१९रोजी नोंद झाली.
कोरोनामुळे महापालिका हद्दीमधील एका रुग्णाचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 617 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 58 हजार 118 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 1 हजार 202 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 1 हजार 122 रुग्ण गृहविलगीकरणात असून 80 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
राज्यात सध्या 21हजार 159 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत राज्यात 76 लाख 86 हजार 670 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.85 टक्के इतके झाले आहे. मागील 24 तासांत राज्यात 15 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर 1.82 टक्के इतका झाला आहे. दरम्यान, राज्यात आजपर्यंत सात कोटी 70 लाख एक हजार 972 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 78,55,359 (10.20 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 37 हजार 252 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 1 हजार 139 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
दरम्यान, राज्यात आतापर्यंत 4456 जणांना ओमायक्रॉनची बाधा झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, 3531 जणांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे. आजपर्यंत एकूण 8904 नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांपैकी 7991 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत. 931 नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
Discussion about this post