व्हीएसआरएस मराठी न्युज -अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी- चिंचवड शहरातील वाकड येथील खासगी रुग्णालयाचे उदघाटन करण्यात आले. अजित पवार नागरिकांना संबोधित करत होते.
अजित पवार म्हणाले, सुदृढ आरोग्यासाठी सकस आहार आणि नियमित व्यायाम केला पाहिजे. तणावमुक्त जीवन आपण जगले पाहिजे. दारू, सिगरेट, ड्रग्सपासून दूर राहील पाहिजे. करोना काळात डॉक्टर आणि आरोग्यसेवेचे महत्व आपल्या सर्वांना कळले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आम्ही चांगले काम केले. जम्बो हॉस्पिटल काढली, नागरिकांना लस दिली, बुस्टर डोस दिले, ऑक्सिजन प्लांट उभारले, रुग्णवाहिका दिल्या. महाराष्ट्रातील जनतेला करोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली.
वातावरणातील बदलांमुळे नागरिक आजारी पडत आहेत. दिल्ली, मुंबई आणि पुण्यात प्रदूषण वाढत आहे. कधी दिल्ली एक नंबरला असते, तर कधी मुंबईत दूषित हवेमुळ आरोग्यावर परिणाम होत आहे. लोकांमधील रोगप्रतिकार शक्ती कमी होत चालली आहे. हे सर्व थांबवायचे असेल तर जीवनशैली बदलावी लागेल, असे अजित पवार म्हणाले.
या वेळी पिंपरी विधानसभाचे आमदार अण्णा बनसोडे व डॉक्टर स्टाफ आदी मान्यवर उपस्थित होते.
Discussion about this post