व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे औचित्य साधून सोमवारी (दि. 10) आकुर्डी नगरपालिकातर्फे जंतनाशक गोळ्यांचे वाटप होत आहे. या मोहिमेमध्ये 1 ते 19 वर्षे वयोगटाच्या आकुर्डीत वाटप करण्यात आले.
सुदृढ आरोग्यासाठी जंतनाशक गोळी ही संजीवनी असून ‘राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम’ वर्षातून दोनवेळा राबविण्यात येते. ही ‘ मोहीम यावर्षी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दि.
१० ऑक्टोबर व मॉप अप दिन १७ ऑक्टोबर २०२२ रोजी नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात राबविण्यात येणार आहे. यामध्ये १ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना वयोगटानुसार निश्चित केल्याप्रमाणे जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. ज्या शाळा सुरु आहेत त्या शाळांमध्ये हजर असणाऱ्या मुला-मुलींना शिक्षकांव्दारे तसेच अंगणवाडीमध्ये जाणाऱ्या मुला-मुलींना अंगणवाडी शिक्षकांव्दारे जंतनाशक गोळी देण्यात येईल.
शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी आशा वर्कर्स घरोघरी जाऊन या गोळ्या वाटप करणार आहेत. आतड्यांमधील कृमीदोष हा बालकांमध्ये व किशोरवयीन मुला-मुलींमध्ये होणार्या रक्तक्षय व कुपोषणास जबाबदार आहे, त्यामुळे मुला-मुलींच्या शिक्षणावर व पुढील आयुष्यातील आरोग्य शारीरिक व मानसिक विकासावर विपरीत परिणाम होतात. त्यामुळे तीव्र प्रमाणात कृमीदोष असलेले विद्यार्थी लवकर आजारी पडतात तसेच त्यांना लवकर थकवा येतो. परिणामी त्यांचे अभ्यासात लक्ष लागत नाही. या सर्व बाबींवर इलाज म्हणून जंतनाशक गोळी आवश्यक आहे. शाळा व अंगणवाडीतून दिली जाणारी ही जंतनाशक गोळी पालकांनी आपल्या पाल्यांना द्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
या वेळी आकुर्डीचे डॉ राहुल साळुंखे सर, माया गिरी ,संदीप जगताप आदी उपस्थित होते.
तसेच अभियानाची जनजागृती करण्यासाठी ठिकठिकाणी बॅनर्स लावण्यात आले आहेत. तरी पालकांनी आपल्या १ ते १९ वर्षापर्यंतच्या सर्व मुलांना दि. १० ऑक्टोबर २०२२ व मॉप अप दिन दि. १७ ऑक्टोबर २०२२ रोजी जंतनाशक गोळी देऊन कृमीदोषामुळे होणाऱ्या रक्तक्षय व कुपोषणापासून प्रतिबंध करावा आणि त्यांचे आरोग्य उत्तम राहील व पोषण स्थिती आणि शिक्षणाचा दर्जा उंचावेल यादृष्टीने महापालिका आयुक्त श्री.सिंह व डॉ पवन साळवे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Discussion about this post