व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –शहरातील दवाखाने व रुग्णालयांच्या नोंदणीसाठीच्या ऑनलाइन सेवचा प्रारंभ प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते झाला.
शहरातील सर्व खासगी दवाखाने व रुग्णालयांची नोंदणी, नूतनीकरण, नोंदणीत बदल करण्यासाठी महापालिकेने ऑनलाइन सुविधा मंगळवारपासून उपलब्ध करून दिली. महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी प्रक्रिया उपलब्ध आहे.
रुग्णालय नोंदणी प्रक्रिया
– नोंदणी अर्ज प्राप्त झाल्यानंतर महापालिका वैद्यकीय अधिकारी संबंधित रुग्णालयाला भेट देऊन निरीक्षणे, अभिप्राय ऑनलाइन नोंदवतील
– स्थळ पहाणीनंतर संबंधित रुग्णालय नोंदणी प्रक्रिया, शुल्क भरणा व अंतिम टप्प्यासाठी मुख्य कार्यालयाकडे वर्ग केले जाईल
– मुख्य कार्यालयातील वैद्यकीय विभाग रुग्णालयांच्या उपलब्ध सेवा-सुविधांनुसार अंतिम दर नोंद करून रुग्णालयांना मागणी चलन उपलब्ध करून देतील
– रुग्णालयाने नोंदणी प्रक्रियेचे शुल्क ऑनलाइन भरल्यानंतर आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या लॉगिनद्वारे अंतिम प्रमाणपत्र उपलब्ध होईल
Discussion about this post