व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस उद्या बुधवार (दि. १४ जून) रोजी असून त्यानिमित्ताने पिंपरी चिंचवड शहरात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात रक्तदान शिबीर, योग निसर्गोपचार व आयुर्वेदिक उपचार, आरोग्य शिबीर, वृक्षारोपण, अनाथ आश्रमातील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप व अन्नदान असे विविध सामाजिक उपक्रम शहर मनसेच्या वतीने राबविण्यात येत असल्याची माहिती शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिली आहे.
मनसेच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, (दि.१५ रोजी) पिंपरीतील मनसे पक्ष कार्यालयात सचिन चिखलेंच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. (दि. ११ ते १८) या कालावधीत मोरवाडी येथे मातोश्री आरोग्य धाम योग निसर्गोपचार व आयुर्वेदिक उपचार केंद्र यांच्या मार्फत सर्व नागरिकांना मोफत उपचार करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे नियोजन शिरीष म्हाबळेश्वर यांनी केले आहे.
प्रभाग क्र. १५ प्राधिकरण काचघर येथील गांधी नर्सिंग होम येथे बाळा दानवले यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. (दि.१८) रोजी काळभोर नगर, मोहननगर येथे अश्विनी चावरिया यांच्या पुढाकारातून आरोग्य मोफत उपचाराचे आयोजन करण्यात आले आहे. (दि. १८) रोजी चिंचवडगाव, रामकृष्ण मोरे सभागृह शेजारी शासन आपल्या दारी / रक्तदान शिबिराचे आयोजन अश्विनी बांगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
सचिन चिखले यांच्यावतीने (दि.१४ ते २०) या कालावधीत निगडी, यमुनानगर येथे १०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. जयसिंग भाट यांच्यावतीने (दि. १४) रोजी सोनवणे वस्ती, चिखली येथे अनाथ आश्रमातील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप व अन्नदान करण्यात येणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेने तर्फे (दि.१४ जून ते १४ जुलै २०२३) या कालावधीत ऑटो टेस्टिंगचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शहरातील सर्व रिक्षा चालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक सुशांत साळवी यांनी केले आहे. तसेच अनिताताई पांचाळ यांच्या वतीने पिंपरीतील जिजामाता हॉस्पिटल येथे (दि.१८) रोजी रुग्णांना फळवाटप करण्यात येणार आहे.
Discussion about this post