व्हीएसआरएस मराठी न्युज –
बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉ. बिधानचंद्र रॉय रॉय यांच्या स्मरणार्थ 1 जुलै 1991 रोजी भारतात प्रथमच ‘राष्ट्रीय डॉक्टर दिन’ साजरा करण्यात आला. मानवतेच्या सेवेत त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. डॉ. रॉय हे उत्तम डॉक्टर होते. शिक्षक असण्यासोबतच ते सक्रिय सामाजिक कार्यकर्तेही होते. त्यांनी 14 वर्ष पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणूनही काम केले. डॉ. रॉय यांचा जन्म 1 जुलै 1882 रोजी झाला. त्यांचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने म्हणजेच 1 जुलै रोजी ‘राष्ट्रीय डॉक्टर्स दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
डॉक्टर आपल्यासाठी देवदूतच आहेत. स्वतःचा जीव धोक्यात घालून कोणत्याही परिस्थितीत रुग्णाचा जीव कसा वाचविण्याचा प्रयत्न करतो. इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे दरवर्षी 1 जुलै रोजी ‘राष्ट्रीय डॉक्टर दिन’ साजरा केला जातो. रुग्णाला परत जीवन देणाऱ्या डॉक्टरांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो.
1882 मध्ये पटना बंगाल प्रेसीडेंट, ब्रिटिश भारतात जन्मलेल्या डॉ. बिधान चंद्र रॉय चिकित्सक, एक स्वातंत्र्य सेनानी, एक शिक्षण विद्ववते आणि एक राजनीतिज्ञ होते. देशाच्या प्रति त्यांचे समर्पण आणि सेवाभाव पाहता 1991 मध्ये डॉक्टर्स डे साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, भारतात प्रथमच 1991 साली राष्ट्रीय डॉक्टर्स डे साजरा करण्यास सुरुवात झाली. यावर्षी केंद्र सरकारने प्रथमच डॉक्टर्स डे साजरा केला. डॉक्टरांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्याची सुरुवात झाली. या दिवशी देशातील डॉक्टरांच्या कार्याचे आभार मानले जातात.
डॉ. बिधानचंद्र रॉय हे बंगालचे माजी मुख्यमंत्री होते. ते एक वैद्य देखील होते, ज्यांचे वैद्यकीय क्षेत्रात मोठे योगदान होते. जाधवपूर टीबी मेडिकल इन्स्टिट्यूटच्या स्थापनेत डॉ. बिधानचंद्र रॉय यांचा मोलाचा वाटा होता. ते भारताच्या उपखंडातील पहिले वैद्यकीय सल्लागार म्हणून प्रसिद्ध झाले. 4 फेब्रुवारी 1961 रोजी डॉ. बिधानचंद्र रॉय यांनाही भारतरत्न प्रदान करण्यात आला होता. मानवतेच्या सेवेतील अभूतपूर्व योगदानाची दखल घेण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा करण्यास सुरुवात केली.
1 जुलैला डॉक्टर्स डे साजरा करण्यामागे एक खास कारणही आहे. थोर वैद्य डॉ. बिधानचंद्र रॉय यांचा जन्म 1 जुलै 1882 रोजी झाला. एवढेच नाही तर 1 जुलै 1962 रोजी डॉ. बिधानचंद्र यांचे निधन झाले. या कारणास्तव त्यांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या दिवशी त्यांच्या स्मरणार्थ प्रत्येक डॉक्टरांचा सन्मान करण्यासाठी 1 जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा करण्याची घोषणा करण्यात आली.
Discussion about this post