व्हीएसआरएस न्युज आकुर्डी-बीना एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने राज्याच्या उपमुख्यमंत्री पवार व बकरी ईद निमित्त रक्तदान शिबीर संपन्न झाले. धर्माने सांगितलेल्या मानवी मूल्यांमध्ये त्याग महत्वाचे मूल्य आहे. इस्लाम धर्मात ही इच्छा, ध्येय सिद्ध करण्यासाठी “कुर्बानी” किंवा सर्वस्वाचा त्याग करण्याची शिकवण आहे. हा त्याग आणि बलिदानाचे प्रतीक म्हणून “ईद – उल – अजहा” (बकरी ईद) हा सण इस्लाम धर्मीयांमध्ये साजरा केला जातो.
यानिमित्ताने बकऱ्याची कुर्बानी देण्याची प्रथाही पाळली जाते. आजच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता सर्व धर्मियांनी आपले सण अधिकाधिक समाजाभिमुख आणि मानवतावादी करणे हेच धर्माचे उन्नयन आहे.
हाच विचार समोर ठेऊन समिती आणि मुस्लीम यांच्यावतीने बकरी ईद निमित्त पशुची कुर्बानी देण्याच्या प्रथेमध्ये काळानुरूप बदल व्हावा व या प्रथेला पर्याय म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन केले . या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि २2 जुलै) आकुर्डी येते स्कुल मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी इकबाल खान (अब्बा) यांच्यातर्फे मा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग भाऊ वाघेरे, पिंपरी विधान सभेचे आमदार अण्णा साहेब बनसोडे, ज्येष्ठ नेते जगदीश शेट्टी , सामाजिक कार्यकर्ते कमरूनिसा शेख उपस्थित होते.
Discussion about this post