व्हीएसआरएस न्युज पिंपरी
रोगप्रतिकारक शक्तीच्या मजबुतीसाठी नागरिकांनो शिबिरात सहभागी व्हा – दिनेश यादव…
पिंपरी (दि. २० जून २०२१) :- आताच्या घडीला संपूर्ण जगावर करोनाचे सावट आहे. त्यामुळे योग दिनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. उद्या सोमवारी (दि. २१) रोजी आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त कुदळवाडीत तात्यासाहेब सपकाळ क्रिडांगण येथे सकाळी ठीक ७.०० वा. योग प्राणायम शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
यात उपस्थितांना पतंजली योग समितीचे प्रशिक्षक योग, प्राणायाम व ध्यानाचे धडे शिकविणार आहेत. रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे, मनाचे सामर्थ्य वाढवून सकारात्मक विचार उत्पन्न व्हावेत, यासाठी योगसाधना उपयुक्त मानली जाते.
त्यामुळे आंतराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने कोरोनाकाळात अधिकाधिक लोकांनी या योग शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन भारतीय जनता युवा मोर्चा पिपंरी चिचंवड शहर व आमदार श्री पै महेशदादा लांडगे युवा मंच, कुदळवाडीच्या वतीने स्वी. नगरसदस्य दिनेश यादव यांनी केले आहे.
Discussion about this post