व्हीएसआरएस न्युज आळंदी-लॉकडाउन काळात वारकरी विद्यार्थ्याना सुमारे एक महिना पुरेल इतके अन्नधान्य, किराणा साहित्य सामाजिक बांधिलकी जोपासत सुपूर्द करण्यात आला.
यावेळी सोशल डिस्टन्स , आरोग्य विषयक नियमांचे काटेकोर पालन करीत सामाजिक बांधीलकीतून एक हात मदतीचा किराणा किट वाटप करीत सेवा कार्य रुजू करण्यात आले.वारकरी शिक्षण संस्थेचे जेष्ठ अद्यापक शांतिब्रम्ह मारुती महाराज कुरेकर यांचे मार्गदर्शनात हा उपक्रम राबविण्यात आला.
या प्रसंगी वारकरी साधकांना आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी अंकुश जाधव, दैनिक पुण्यनगरीचे प्रसाद शिंगोटे, वारकरी शिक्षण संस्थेचे खजिनदार भालचंद्र नलावडे, सचिव नाना महाराज चंदिले, विश्वस्त अप्पाबुवा पाटील महाराज , आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, आळंदी पोलिस ठाण्याचे गुप्त वार्ता विभागाचे मच्छीन्द्र शेंडे या प्रमुख मान्यवरांचे हस्ते किटचे वाटप करण्यात आले.
या वेळी आळंदी जनकल्याण फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रल्हाद भालेकर, पत्रकार विलास काटे,अर्जून मेदनकर,उल्हास महाराज सूर्यवंशी, माणिक महाराज मुखेकर शास्त्री, व्यवस्थापक तुकाराम बुवा मुळीक, उमेश बागडे, अर्जुन बुवा बिराजदार, योगेशबुवा साळुंके, भीमसेन शिंदे, राजेंद्र होन्नर , अविनाश महाराज, हरिश्चंद्र महाराज यांचेसह साधक वारकरी उपस्थित होते .