व्हीएसआरएस न्युज पिंपरी-चिंचवड महापालिकेची नोव्हेंबर महिन्याची सर्वसाधारण सभा आज यशवंतराव चव्हाण सभागृह येथे आयोजित केली होती.
महापौर माई ढोरे गैरहजर होत्या. त्यामुळे उपमहापौर घुले यांना महापौर म्हणून महापालिका सभा कामकाज चालविण्याची संधी मिळाली. हिराबाई घुले यांची 23 मार्च 2021 रोजी शहराच्या उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली.
सर्वसाधारण सभेमध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली. हात वर करणाऱ्या प्रत्येकाला बोलण्याची देखील त्यांनी संधी दिली. उपमहापौर हिराबाई घुले म्हणाले, महापालिका सर्वसाधारण सभेचे कामकाज चालविण्याची संधी आज मला मिळाली.
Discussion about this post