व्हीएसआरएस न्युज पिंपरी –पिंपरी चिंचवड पोलीस दलात कमी मणुष्यवळ असताना जोखीम पत्करुन दिवस-रात्र रस्त्यावर उभे राहुन जनतेच्या सेवेसाठी पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी उत्कृष्ट कर्तव्य बजावले आहे. नागरिकांच्या सुविधेकरिता विविध सेवा उपक्रम देखील राबविले आहेत. हि कौतुकास्पद बाब आहे.” अशा शब्दात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पिंपरी चिंचवड पोलीसांचे कौतुक केले आहे.
पिंपरीचिंचवड आयुक्तालयातील नविन समिती कक्षाचे उदघाटन गृहमंत्री वळसे पाटील यांच्या हस्ते शनिवार (ता. 17) रोजीपार पडले. या निमित्त त्यांनी
पिंपरी चिंचवड पोलीसआयुक्तालयाला भेट दिली. पोलीस महासंचालक संजय पांडे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सर्व सहायक पोलीस आयुक्त आणि पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी व अंमलदार आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
पोलीसमहासंचालकसंजयपांडे पोलीस करण्याच्या अनुषंगानेआयुक्तालयातील सर्व शाखांची पाहणी केली. गुन्हे सांख्यिकीचाआढावा घेवुन संघटीतगुन्हेगारीचे समूळ उच्चाटनमार्गदर्शन केले. पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या
आरोग्याच्या दृष्टीकोनातून पोलीसांकरीता स्मार्ट बॅड (घड्याळ) व पोलीस ठाणे स्तरावर गस्त घालणेकरीता प्रत्येक पोलीस ठाण्यास वाटप केलेल्या 20 सायकली आणि पोलीस पाल्यांसाठी राबविलेल्या विविध उपक्रमाचे कौतुक केले. तसेच सर्वांना मार्गदर्शन केले.
पोलीस आणि नागरिकांमध्ये संवाद वाढावा,पोलिसांबद्दल नागरिकांचे चांगले मत व्हावे, नागरिकांचे प्रश्न सुटावेतयासाठी पोलीस आयुक्तालय हद्दीतील प्रत्येक पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीसनिरीक्षकाने महिन्यातून एकदा जनता दरबार घ्यावा. याची तारीख नागरिकांनाअगोदर कळविण्यात यावी. नागरिकांनी आपल्या प्रश्नांसंदर्भात पोलीसांना आधीकाही दिवस अर्ज द्यावा. जेणेकरून प्रश्न सोडविण्यास सोपे होईल. तसेच
त्यांच्या प्रश्नांचे निराकारण होण्यास मदत होईल. जनता दरबारामुळेनागरिकांमध्ये पोलिसांबद्दल एक चांगला दृढ विश्वास निर्माण होईल, असेहीगृहमंत्री पाटील म्हणाले.
दरम्यान राज्यात पहिल्या टप्यात ५ हजार २००
पोलीस शिपायांची भरती केली जाणार आहे. यामध्ये पिंपरी आयुक्तालयाला ७२०कर्मचारी देण्यात येणार आहेत. दुसया टप्यात आणखी ७ हजार पदांची भरती करण्यात येणार असून यामध्ये आयुक्तालयाला कर्मचारी देण्यात येतील, अशी माहितीगृहमंत्री वळसे-पाटील यांनी दिली.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करुन आयुक्तालयातील विविध शाखा व कामकाजा विषयी माहिती दिली. अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे आणि पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी सादरीकरणाद्वारे पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील सर्व गुन्हेविषयक तसेच आयुक्तालयातील पोलीसअधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या कामगिरी बाबत चांगल्या प्रमुख पाहुण्यांना माहिती करुन दिली.
Discussion about this post