व्हीएसआरएस न्युज पिंपरी –
पिंपरी : काेराेनाकाळात उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल पुणे विभागातून पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक कुंदन गायकवाड यांचा ‘उत्कृष्ट नगरसेवक’ म्हणून दादासाहेब फाळके इंडियन टेलिव्हिजन बेस्ट कॉर्पोरेटर’ हा पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले.
यावेळी मनाेगत व्यक्त करताना नगरसेवक कुंदन गायकवाड म्हणाले “हा पुरस्कार जरी मी माझ्या नावाने स्वीकारला असला तरी माझ्या सर्व कार्यकर्ते माझे मित्र या सर्वांना समर्पित आहे. संघटन असल्याशिवाय कोणतीही कामगिरी ही उत्कृष्ट होत नसते. असे मला वाटते. या पुढेही असेच चांगले काम करण्यासाठी पाठीवर पडलेली ही कौतुकाची थाप प्रेरणादायी ठरणार आहे.
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे माझे आधारस्तंभ, प्रत्येक गोष्टीत मला खंबीरपणे पाठीशी असणारे,कुठल्याही कामासाठी मोलाचे मार्गदर्शन करणारे, आमचे मार्गदर्शक आमदार महेशदादा लांडगे यांनी मला नगरसेवक होण्याची संधी दिली म्हणूनच मला हे काम करता आले. त्यांचा मी सदैव ऋणी आहे.
Discussion about this post