व्हीएसआरएस न्युज पिंपरी-
क्रीडा भारती पिंपरी चिंचवड यांच्या वतीने 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी आवाहन
आत्ताच्या या करून महामारी च्या साथीच्या काळात प्रत्येकानं आपली शारीरिक क्षमता वाढवणं टिकवणं आवश्यक आहे त्यासाठी अत्यंत प्राचीन आणि सहज करता येणाऱ्या योगाभ्यासाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकार झाला आहे आपणही यामध्ये सहभागी होऊन दररोज हा योगाभ्यास करावा
आनंदासाठी खेळ – सर्वांसाठी खेळ या संकल्पनेतून आरोग्यसंपन्न, चारित्र्यवान नागरिक निर्माण व्हावेत, समर्थ भारताच्या निर्मिती मध्ये प्रतिदिन एक पाऊल उचलावे या उद्देशाने 1992 पासून क्रीडाभारती कार्यरत आहे.
विश्व योग दिवस कार्यक्रमात अधिकाधिक नागरिकांनी सहकुटुंब सहभागी व्हावे म्हणून क्रीडाभारती नेहमीच प्रयत्नशील असते. *सर्वसामान्य नागरिक सहजतेने करू शकतील अश्या आसनांचा एक व्हिडिओ आणि त्यासोबत माहितीपत्रक भारतभर सर्वांपर्यंत पोचवण्याची योजना आहे. *तरी आपण सर्वांनीच सहकुटुंब योगाभ्यास करावा आणि विश्व योग दिवस सोमवार दिनांक २१/०६/२०२१ रोजी सकाळी ठीक ७.३० ते ८.३० या वेळेत कार्यक्रमात सहभाग व्हावे
सविस्तर माहितीसाठी संपर्क जगदीश सोनावणे सर ९४२३२२४८२३
शेखर कुलकर्णी सर ९४२२५१०६०६
राजेंद्र महाजन सर ७७२२०३८११३
👉एक दिवस अगोदर सदर कार्यक्रमाची लिंक पाठवली जाईल👈
भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. आताच्या घडीला संपूर्ण जगावर करोनाचे सावट असताना योग दिनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शक्य असलेल्या प्रत्येकाने योगाचा अंतर्भाव आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच करावा, असे आवाहन केले जात आहे. जागतिक योग दिन नेमका कधीपासून साजरा केला जाऊ लागला? करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची योग दिनाची थीम काय आहे? जाणून घेऊया…
आंतरराष्ट्रीय योग दिवस हा दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी याला मान्यता दिली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांच्या सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा झाल्यानंतर डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.
जगदीश सोनावणे
मंत्री क्रीडा भारती पिंपरी चिंचवड शहर
Discussion about this post