व्हीएसआरएस न्युज पिंपरी दिं. १९,
काँग्रेस नेते व खासदार राहूल गांधी यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत आज शहर युवक काँग्रेस ने राहूल गांधी नां पंतप्रधान करण्याचा संकल्प सामुहीक प्रतिज्ञे द्वारे केला.
व सफाई कर्मचा-यांना आरोग्य साहित्य भेट दिले.
राहूल गांधी यांचा वाढदिवस आज महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस ने राज्यभरात संकल्प दिवस म्हणून साजरा केला या अंतर्गत बेरोजगारी व भाजपा सरकार संपवून राहूल गांधी ना पंतप्रधान करण्याचा संकल्प युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी सामुहीक प्रतिज्ञा स्वरूपात डाॅ.डी.वाय.पाटील महाविद्यालया समोर केला.
तसेच पिंपरी, डिलक्स चौक, नेहरूनगर, अजमेरा काॅलनी व काळेवाडी येथील पिंपरी चिंचवड मनपा च्या आरोग्य कार्यालयात जाऊन (स्टिमर) वाफ यंत्रांचे वाटप सफाई कर्मचारी-यांना केले या अंतर्गत एकूण १५० स्टीमर्स चे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे सचिव अक्षय जैन, युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पिंपरी चिंचवड काँग्रेस सेवादल चे शहराध्यक्ष विरेंद्र गायकवाड, प्रदेश काँग्रेस सचिव कौस्तूभ नवले, एन.एस.यु.आय. चे प्रदेश उपाध्यक्ष उमेश खंदारे, एन.एस.यु.आय.चे शहराध्यक्ष डाॅ.वसिम ईनामदार, पिंपरी चिंचवड मनपा चे सफाई कर्मचारी तक्रार निवारण समिती चे उपाध्यक्ष ॲड. सागर चरण, युवक काँग्रेस चे विधानसभा अध्यक्ष हिराचंद जाधव, नासीर चौधरी, सौरभ शिंदे, शहर सरचिटणीस शंकर ढोरे,अपूर्वा इंगवले, अलोक लाड, स्वप्निल बनसोडे, योगेश नायडू, बाबा गायसमुद्रे, दिपक भंडारी, संतोष देवकर, मिलिंद बनसोडे, अर्णव कामठे, प्रविण जाधव आदि उपस्थित होते.
Discussion about this post