व्हीएसआरएस न्युज निगडी-पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओटास्कीम परिसरात गणपती मिरवणूक सुरू असताना दोन गटात भांडण झाले.
ते संपत यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला. त्या कारणावरून आरोपींनी गायकवाड यांच्या घरावर दगड मारले. गायकवाड यांनी आरोपींच्या घरासमोर जाऊन ‘तुमची आमच्या घरावर दगड का मारले’ असा जाब विचारला.
या कारणावरून आरोपी वैभव याने सिमेंटच्या गट्टूने गायकवाड यांच्या कपाळावर जोरात मारले तर अन्य आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गायकवाड यांना ठार मारले.
माहिती मिळताच गा. पोलीस उप श्री. मंचक इपर सो परिमंड सहा.पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे. पिंपरी विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गणेश स.पो.नि.लक्ष्मण सोनवणे, नाईट राउंड अधिकारी तपास पथकाचे विलास केकाण,तुषार गेंगजे व इतर अंमलदार, मार्शलथे अंमलदार यांनी तत्काळ गुन्ह्याचे घटनास्थळास भेट देऊन आरायांचे घरी गेले असता आरोपीचे घर बंद मिळून आले. मा. पोलीस उप आयुक्त श्री. मंचक इप्पर सो परिमंडळ १. पिंपरी चिंचवड तसेच सहा. पोलीस आयुक्त श्री डॉ. सागर कवडे ,पिंपरी विभाग यांचे सुचना मार्गदर्शन खाली निगडी पोलीस ठाणे व गुन्हे शाखा युनिट २ चे अंमलदार यांचे टिम तयार वरुन आरोपीचे तपास कामी रवाना केले. त्यानंतर पो.हवा. सतिश ढोले यांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे व गोपणीय माहितीच्या आधारे
पोलिसांना माहिती मिळाली की, आरोपी संतोष हा त्याच्या घरात लपून बसला आहे. पोलिसांनी थेट त्याच्या घराच्या छताचे पत्रे उचकटून घरात प्रवेश केला. घरात संतोषचा शोध घेतला असता तो घरातील पलंगाखाली लपून बसला होता. पोलिसांनी संतोषला अटक केली.
ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश लोखंडे, केरबा माकणे, तपास पथकातील पोलीस हवालदार किशोर पढेर, आनंद साळवी, सतिश ढोले, किसन शिंदे, पोलीस नाईक विनोद व्होनमाने, राहुल मिसाळ, विजय बोडके, रमेश मावसकर, भुपेंद्र चौधरी, तुषार गेंगजे, विलास केकाण, पोलीस शिपाई अमोल सांळुखे, तसेच गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक नंदु कदम तसेच पोलीस अंमलदार यांनी केली आहे.
Discussion about this post