व्हीएसआरएस न्युज पिंपरी-काळेवाडी .थेरगाव प्रलंबित दफनभूमी प्रश्नी कब्रस्तान संघर्ष समितीच्या शिष्ट,मंडळाने पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त मा. राजेश पाटील साहेब यांची भेट घेतली व दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी लेखी निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.
यावेळी कब्रस्तान संघर्ष समिती ची बाजू मांडताना सिद्दीकभाई शेख यांनी सर्व पार्श्वभूमी आयुक्तांना समजावून सांगितली व उपलब्ध जागांबाबत माहिती दिली. त्यावेळी समाजच्या भावना लक्षात घेऊन तात्काळ दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी विनंती कब्रस्तान संघर्ष समितीकडून करण्यात आली. यावेळी मा. आयुक्त राजेश पाटील यांनी सकारत्मक प्रतिसाद देत यावर काम सुरु असून योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले.
यावेळी पिंपरी पोलीस स्टेशनचे गुन्हे पोलीस निरीक्षक भोजराज मिसाळ यांची भेट घेऊन समाजाच्या भावनांचा उद्रेक होण्यापूर्वीच जागा उपलब्ध करून देणेबाबत प्रशासनसोबत पत्रव्यवहार करण्याची विंनती केली. जागा नसल्याने मृतदेह महानगरपालिकेत दफन करण्याचा यापूर्वीच कब्रस्तान संघर्ष समितीकडून देण्यात आलेला आहे.
कब्रस्तान संघर्ष समितीच्या शिष्टमंडळमध्ये शबीर शेख .अब्दुलगणी शेख ,एजाज पटेल , हमीद शेख ,लतिफभाई सय्यद ,अल्ताफ शेख ,अकबर शेख ,हमीद शेख ,हाजीमलंग शेख ,कय्युम शेख ,कारी इकबाल , इम्रान शेख ,मुस्तफा तांबोळी , सिद्दीकभाई शेख आदीजण उपस्थित होते.
Discussion about this post