व्हीएसआरएस न्युज पिंपरी -पिंपरी बाजारपेठ प्रभागातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक डब्बू आसवानी यांचे मतदार यादीतील नाव गायब झाले आहे. या प्रकरणी आसवानी यांनी निवडणूक विभागाकडे तक्रार केली आहे.
डब्बू आसवानी हे पिंपरी बाजारपेठेतील (क्रमांक २१) प्रभागाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी काही दिवसांपूर्वी पाहणी केली होती, तेव्हा त्यांचे नाव मतदार यादीत होते.
मात्र, मंगळवारी (३० नोव्हेंबर) दुपारी मतदार यादी पाहिल्यानंतर त्यांचे नाव गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी त्यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडे तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. हे कृत्य कोणीतरी जाणीवपूर्वक केले असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली.
Discussion about this post