व्हीएसआरएस न्युज पूर्व पीसीएमटीमधील सव्वाशे कर्मचाऱ्यांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवर कायम करण्यात गुरुवारी पीएमीएमएलच्या पुण्यात झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
पूर्व पीसीएमटीतील कार्यशाळेमधील चतुर्थश्रेणी कर्मचारी व चालक पदावरील काही कर्मचारी असे एकूण सव्वाशे कर्मचारी मागील अनेक वर्षांपासून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सेवा करीत होते. या कर्मचाऱ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवर कायम करावे असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला, अशी माहिती पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अखत्यारीत असणारी पीसीएमटी आणि पिंपरी, पुणे महानगरपालिकेच्या अखत्यारीत असणारी पीएमटी या दोन्ही परिवहन संस्थांचे 15 डिसेंबर 2007 ला पुणे महानगर परिवहन महामंडळात (पीएमपीएमएल) मध्ये विलिनीकरण करण्यात आले. यानंतर पीएमपीची संचलन तूट म्हणून पुणे महापालिका 60 टक्के आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका 40 टक्के याप्रमाणे रक्कम देतात. त्यामुळे या सव्वाशे कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी वेगळी तरतूद करावी लागणार नाही.
Discussion about this post