व्हीएसआरएस न्युज पिंपरी -पिंपरी चिंचवड शहरात खुनाचे सत्र सुरूच आहे. धारदार शस्त्राने वार करून महिलेचा निर्घृण खून करण्यात आला. धावडे वस्ती, भोसरी येथे शनिवारी (दि. २५) रात्री सव्वानऊच्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत कलावती यांच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर फेब्रुवारी २०२१ पासून त्या मुलासह धावडेवस्ती येथे राहत होत्या. दरम्यान, शनिवारी रात्री सुमारास अज्ञात व्यक्तीने घरात घुसून धारदार शस्त्राने वार करीत त्यांचा खून केला. खुनाचे कारण समजू शकले नाही.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसराची पाहणी करून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
कलावती धोंडीबा सुरवार (वय ३८, रा. धावडेवस्ती, भोसरी), असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
Discussion about this post