व्हीएसआरएस न्युज पिंपरी-वाघेरे येथील म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पातील सदनीकाधारकांना ताबा देण्यात आला. सदर प्रकल्पामध्ये 1 हजार 233 सदनीका आहेत. त्यामधील मध्यम उत्पन्न गटातील 595 सदनिका व उच्च उत्पन्न गटातील 340 सदनिका अशा एकूण 935 सदनिकांची सोडत काढण्यात आली होती.
प्रातिनिधिक स्वरूपात राजेश्वर कुलकर्णी, रोहन प्रभू, शैलेंद्र धीवार, लक्ष्मी कोलते, सुधीर सावंत, रणजित कदम व इतर सदनिका धारकांना चावी देण्यात आली. आगामी काळात देखील जास्तीत जास्त लोकांना आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी असे उत्तमोत्तम प्रकल्प उभारण्यासाठी आमदार म्हणून शक्य ती मदत करेल, असे आश्वासन पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी यावेळी दिले.
सोडतीमध्ये यशस्वी झालेल्या प्रतिनिधिक सदनिकाधारकांना चावी वितरीत करण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, म्हाडाचे कार्यकारी अभियंता अनंत खेडकर, महापालिकेच्या विद्यमान नगरसेविका उषा वाघेरे, निकिता कदम, संदीप वाघेरे, पौर्णिमा सोनवणे तसेच बी. जी. शिर्के कंपनीचे प्रमोद पवार आदी उपस्थित होते.
Discussion about this post