व्हीएसआरएस न्युज पिंपरी- पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या एकूण 399 याद्यांमधील 18 हजार 256 मतदारांची छायाचित्रे मतदार यादीमध्ये दिसून येत नाहीत.
ज्या मतदारांची छायाचित्रे मतदार यादीत नाहीत, त्यांनी त्यांचे छायाचित्र रहिवास पुराव्यासह 206 पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या निगडी प्राधिकरण येथील डॉ. हेगडेवार भवन येथील कार्यालयात समक्ष अथवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे आठ दिवसात जमा करावेत. ज्या मतदारांची कालावधीत रहिवास पुरावा अथवा छायाचित्र जमा होत नाहीत, त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार असल्याचे नोंदणी अधिकारी यंनी जाहीर केले आहे.
पिंपरी विधानसभा मतदार संघातील मतदार छायाचित्र यादी पुनरीक्षण कामकाज निवडणूक विभागाने हाती घेतले आहे. काही मतदारांची छायाचित्रे अस्पष्ट दिसत असल्याने निवडणूक विभागापुढे संबंधित मतदार ओळखणे कठीण होणार आहे. त्यामुळे अशा मतदारांच्या नावाची यादी राज्याच्या निवडणूक विभाग, पुणे जिल्हाधिकारी आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती पिंपरी विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी यांनी दिली आहे.
Discussion about this post