व्हीएसआरएस न्युज पिंपरी-चिंचवड महापालिकेत छोट्या, मोठ्या कामांसाठीही सल्लागार नेमले जात होते. प्रत्येक विकासकामांसाठी सल्लागार, वास्तुविशारद नेमण्याचा धडाकाच लावला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत फुटकळ कामांसाठीही सल्लागारांच्या होत असलेल्या नेमणूकांबाबत टीका होऊ लागल्याने विविध विकास प्रकल्पाच्या कामांकरिता नियुक्त करण्यात आलेले सल्लागार व वास्तुविशारद यांचे जूने पॅनेल रद्द करण्यात आले आहे. यापुढे सल्लागाराची नेमणूक 5 कोटींपेक्षा जास्त खर्चाच्या कामांसाठी तर वास्तुविशारदांची नेमणूक 2 कोटींपेक्षा जास्त रकमेच्या कामांकरिताच केली जाणार आहे. नव्याने सल्लागार, वास्तुविशारदांची नेमणूक करण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.
पालिकेच्या अभियंत्यांना गलेलठ्ठ पगार दिले जात असताना स्मशानभुमी बांधकाम, पुतळ्याचे सुशोभिकरण, पदपथ आणि फर्निचर बसविण्यासारख्या शुल्लक कामांसाठीही प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याचे पेव फुटले आहे. महापालिका स्थायी समितीमार्फत ऐनवेळचे सल्लागार, वास्तुविशारद नेमण्याचे प्रस्ताव बिनबोभाट मंजुर केले जात होते. या सल्लागारांवर प्रकल्प रकमेच्या दोन ते तीन टक्के रूपयांची उधळपट्टी केली जात आहे.
Discussion about this post