व्हीएसआरएस न्युज पुणे-पुणे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष श्री श्रीकांत शिरोळे आणि श्री सदानंद शेट्टी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला असून यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आपल्या पक्ष प्रवेशामुळे पुणे शहर राष्ट्रवादीला निश्चितच बळ मिळेल असे अजित यांनी याप्रसंगी सांगितले. आपण दोघांनीही महापालीकेत उत्तम काम केले याचा उल्लेख केला.या प्रसंगी शहराध्यक्ष श्री प्रशांत जगताप, प्रदेश प्रवक्ते श्री अंकुश काकडे, जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष श्री प्रदीप गारटकर, श्री प्रकाश म्हस्के, इत्यादी उपस्थित होते.पुढील आठवड्यात आणखी काही प्रमुखांचा प्रवेश होईल असे प्रशांत जगताप यांनी सांगितले.
Discussion about this post