व्हीएसआरएस न्युज पिंपरी- पुणे शहरासाठी पीएमपीएमएलची दहा रुपयांत कुठेही दिवसभर फिरा हि योजना आजपासून सुरु होत आहे. या योजनेसाठी पुणे शहरातील ९ मार्ग निश्चित केले असून ५० मिडी बस त्यासाठी असतील व डिसेंबरमध्ये संपूर्ण पुणे शहरासाठी ३०० बसेस उपलब्ध झाल्यानंतर या योजनेचा विस्तार केला जाणार आहे.
पुणे महानगरपालिकेतील पदाधिकारी व प्रशासनास हि योजना राबविता येते तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सत्ताधारी पदाधिकारी व प्रशासनास पिंपरी चिंचवड शहरात हि योजना का राबविता येत नाही? पिंपरी चिंचवड पालिकेचे सत्ताधारी पदाधिकारी नागरीकांच्या फायद्याच्या योजना राबविण्याचे सोडून पे अँड पार्क योजने सारख्या योजना राबवून कोरोनामुळे नागरीक आर्थिकदृष्टया हतबल झाले असताना नागरीकांना वेठीस व भूर्दड बसविणा-या योजना राबविन्यात धन्यता मानत आहेत. जे पुण्याच्या पदाधिका जे यांना जमू शकते ते पिंपरी चिंचवडच्या सत्ताधारी पदाधिका यांना का जमू नये?
पिंपरी चिंचवड शहरात पीएमपीएमएलची दहा रुपयांत दिवसभर प्रवास योजना राबण्यात यावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड मनपा विरोधी पक्ष नेते राजू मिसाळ यांनी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, पिंपरी चिंचवड शहरातील पूर्वश्रमीची पी.सी.एम. टी. व पी. एम. टी. या दोन संस्थाचे विलनीकरण करण्यात येऊन पी.एम.पी.एम.एल. कंपनीची स्थापना करण्यात आली असून पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी कार्यरत आहे.
आपणांस विनंती आहे की, पुणे महानगरपालिका ज्या पध्दतीने पुणे शहरासाठी १० रुपयांत दिवसभर प्रवास हि योजना राबवित आहे, त्याच प्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनेही पुण्याच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड शहरासाठी १० रुपयांत दिवसभर फिरा हि योजना तातडीने पिंपरी चिंचवड शहरासाठी राबविण्यात यावी. असे हि दिलेल्या निवेदनात राजू मिसाळ यांनी म्हंटले आहे.
Discussion about this post