व्हीएसआरएस न्युज पिंपरी -पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरातील रस्ता दुरुस्ती डांबरीकरण रस्ता कोकिटीकरण तसेच पदपथांची च्या कामांना वेग आला आहे.
महापालिकेच्या प्रभाग 1 मधील मोरे वस्ती म्हेत्रे वस्ती मधील रस्त्याच्या पदपथां वरील जूने सिमेंटचे ब्लॉक काढून नवीन कलर सिमेंट ब्लॉक बसविण्याच्या कामाला सुरुवात झाली त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे प्रभाग 1 मधील फ प्रभाग अध्यक्ष, नगरसेवक कुंदन गायकवाड, नगरसेविका, विधी समिती सभापती स्वीनल म्हेत्रे नगर सेविका साधना मळेकर यांच्या प्रयत्नातून व माजी नगरसेवक सुरेश महेत्रे यांच्या सहकार्यातून मोरे वस्ती मधील पदपथा चे सुशोभीकरण व पेव्हिंग ब्लॉक बसण्याचे काम महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे पादचारी यांची होणारी गैरसोय टाळणार असून रस्त्याच्या कडेला पदपथ यामुळे लहान मुले ज्येष्ठ नागरिक तसेच पादचान्यांना रस्त्याने ये-जा करताना पदपथ सोयीस्कर ठरत आहे त्यामुळे पदपथ नागरिकांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे या प्रभागातील तिन्ही नगरसेवकांच्या प्रयत्नातून तसेच आमदार महेश दादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेचे स्थापत्य विभागाकडून प्रभाग 1 मधील चिखली गावठाण, रामदास नगर, पाटील नगर, मोरे वस्ती मधील अंगणवाडी रस्ता, भाजी मंडई परिसर तसेच सह्याद्री सोसायटी तसेच इतर सोसायट्यांमध्ये कलर सिमेंट ब्लॉक बसविण्याचे काम सुरू आहे .
त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना रस्त्याने ये-जा करताना करावी लागणारी कसरत टळणार आहे लहान मुले ज्येष्ठ नागरिकांची सोय होणार आहे त्यामुळे स्थानिक नागरिक तसेच सोसायटीमधील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे
Discussion about this post