व्हीएसआरएस मराठी न्युज मुंबई -संतोष परब हल्लाप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली होती.
आज त्यांची पोलीस कोठडी संपली आहे. त्यामुळे त्यांना परत न्यायालयात हजर करण्यात आले आहे. पोलिसांनी नितेश राणे यांची कोठडी वाढवून देण्याची मागणी केली आहे. पण न्यायालयाने 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. पोलीस कोठडी संपली असली तरी आता त्यांचा मुक्काम कोठडीतच असणार आहे. आज जामिनासाठी अर्ज करण्यात येणार आहे.
संतोष परब हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांना एकाच वेळी कणकवली दिवाणी न्यायालयात हजर केले गेले. दोघांचीही आज पोलीस कोठडी संपत असल्याने त्यांना कोर्टात हजर करण्यात आले.
आमदार नितेश राणेंना पुण्याला नेऊन त्यांची चौकशी करायची आहे, त्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे सरकारी वकिलांनी म्हटलं. तर नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी यावर युक्तिवाद करत आरोपीला पुण्याला घेऊन जाण्याची आवश्यकता का आहे असा सवाल केला होता. त्यामुळे नितेश राणेंना पोलीस कोठडी देऊ नये असाही युक्तीवाद त्यांनी केला.
Discussion about this post