व्हीएसआरएस न्युज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये स्केटींग खेळाडू दुर्गा मिरजकर, वेदमूर्ती विनायक रबडे आणि पीएचडी पदवी प्राप्त डॉ. प्रियंका साखरे यांचा आज महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते सचिन चिखले,
क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, जैव विविधता व व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, आयुक्त राजेश पाटील, प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, सागर आंगोळकर, नगरसदस्य राजेंद्र गावडे, नगरसदस्या अपर्णा डोके, अश्विनी चिंचवडे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप आदी उपस्थित होते.
Discussion about this post