व्हीएसआरएस न्युज पिंपरी- महापालिकेची निविदा प्राप्त करत असताना जी कामे १० टक्यापेक्षा कमी दराची असतात, ती कामे पुढील प्रत्येक कमी दरासाठी अनामत रक्कम, बँक हमी किंवा एफडीआर भरून घेतली जातात. त्यानंतर या कामांना मंजूरी देऊन स्थायी समितीच्या मान्यतेने करारनामा करून कामाचे आदेश दिले जातात.
परंतु, गेल्या काही दिवसात बोगस बनावट बँक हमी, एफडीआर सादर करुन महापालिकेची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे.
मागील तीन वर्षातील सुमारे १०७ कंत्राटांमध्ये बोगस एफडीआर आणि बँक हमी देऊन महापालिकेची फसवणूक करण्यात आली आहे. यापुढे अशा प्रकारे महापालिकेची फसवणूक होऊ नये यासाठी अशा ठेकेदारांना काळया यादीत टाकणे तसेच बनावट एफडीआर सादर करून कामे मिळविळेल्या ठेकेदारंवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कंत्राट मिळविताना बनावट फिक्स्ड डिपॉझिट रिसीट (एफडीआर) आणि बँक हमी देऊन पिंपरी-चिंचवड महापालिकेची फसवणूक करणा-या १८ ठेकेदारांना ३ वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. त्यांना ३ वर्ष महापालिकेच्या निविदा प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. तसेच त्यातील १० ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.
‘या’ ठेकेदारांना टाकले काळ्या यादीत !
मे.डी.डी.कन्स्ट्रक्शन, मे.वैदेही कन्स्ट्रक्शन, मे.एस.बी.सवई, मे.पाटील अँण्ड असोसिएट्स, मे.कृती कन्स्ट्रक्शन, मे.राधिका कन्स्ट्रक्शन, मे.बी.के.कन्स्ट्रक्शन अँण्ड इंजिनिअरींग, मे.भैरवनाथ कन्स्ट्रक्शन, मे.त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन, मे.श्री दत्तकृपा एंटरप्रायजेस, मे.चैतन्य एंटरप्रायजेस, मे.डी.जे.एंटरप्रायजेस, मे.दीप एंटरप्रायजेस, मे.बी के खोसे, मे.म्हाळसा कन्स्ट्रक्शन प्रा.लि., मे.एच ए भोसले, मे.सोपान जनार्दन घोडके आणि मे.अतुल आर.एम.सी. यांनी सादर केलेल्या बँक हमी / एफडीआर बनावट असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या १८ ठेकेदारांना निविदा भरण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.
Discussion about this post