व्हीएसआरएस न्युज पिंपरी राज्यात भाजपचे सरकार असताना २०१७ ची महापालिका निवडणूक चार सदस्यीय वॉर्ड पद्धतीने झाली होती.
सध्याच्या चार सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे वॉर्डांचे क्षेत्रफळ खूप मोठे आहेत. एका वॉर्डात दोनपेक्षा अधिक गावांचा समावेश असून भौगोलिक क्षेत्र मोठे आहे. पद्धतीमुळे एकाच पक्षाच्या पॅनेलला एकगठ्ठा मतदान होऊन विजयाची शक्यता अधिक असते. मात्र, महापालिकेची २०१२ ची निवडणूक द्विसदस्यीय पद्धतीने झाली होती. त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले होते.
ही पद्धती भौगोलिक दृष्ट्या व प्रचाराच्या दृष्टिने सोयीची असल्याचे बोलले जात आहे. पण, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्षांचा समावेश असल्याने व त्यांनी एकत्रित निवडणूक लढविल्यास त्या पक्षांतील सर्वच इच्छुकांना संधी मिळणे अवघड आहे. कारण, इच्छुकांची संख्याही अधिक असेल. त्यामुळे कोणता भाग कोणत्या पक्षाला सुटणार, तो पक्ष कोणाला संधी देणार यासह स्वतंत्रपणे निवडणूक लढविल्यास किंवा एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक झाल्यास काय फायदा होऊ शकेल, याबाबतही चर्चा रंगत आहेत.
कायद्यानुसार निवडणुकीपूर्वी सहा महिने अगोदर वॉर्डरचना होणे आवश्यक असते. याचा विचार केल्यास ऑगस्ट अखेरपर्यंत वॉर्डरचना होणे आवश्यक आहे. सध्याची चार सदस्यीय प्रभाग पद्धतीस राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा विरोध आहे. त्यामुळे आगामी निवडणूक नवीन वॉर्डरचनेनुसार होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, त्यासाठी प्रशासनाच्या हाती केवळ २१-२२ दिवस उरले असल्याने वॉर्डरचना कशी असेल? याचीच चर्चा इच्छुकांमध्ये आहे.
तसेच कार्यक्रता नविन मतदार नोंदणी अभियान आप आपले वार्ड मध्ये शुरु केले आहे.
नविन नाव समाविष्ट करणे फॉर्म नं. ६ वयोमर्यादा ०१ जानेवारी २०२१ रोजी वय १८ वर्ष पुर्ण
– नाव वगळणे (मयत अथवा कायम स्वरूपी स्थलांतर) व अक्षेप घेणे फॉर्म नं. ७
– दुरूस्ती करणे फॉर्म नं.८ यादी (पत्ता) बदल करण्यासाठी फॉर्म नं. ८ अ (एका यादीतुन दुसऱ्या यादीत स्थलांतर)
आवश्यक कागदपत्रे :
– एक पासपोर्ट साईज फोटो (वर्तमान)
• आधारकार्ड/पॅनकार्ड किंवा कॉलेज आय. डी. कार्ड
वास्तव्य पुरवा लाईट बिल, गॅस बिल किंवा आधारकार्ड •वडीलांचे, आईचे किंवा शेजारच्या व्यक्तिचे ओळखपत्र
– जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला
•सर्व पुरावे सेल्फ अटेस्टेड आणि प्रतिज्ञापत्र भरणे, इत्यादी कार्यक्रम आजी माजी नगरसेवक व इच्छुक राबवतान दिसतात आहे.
Discussion about this post