व्हीएसआरएस न्युज पिंपरी पालिकेतील मधुकर पवळे सभागृहात सकाळी अकरा वाजता निवडणुकीला सुरुवात होणार असून पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त, नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली.
आठही प्रभागात भाजपचे वर्चस्व असल्याने आठही अध्यक्ष भाजपचे होणार हे निश्चित आहे. प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी 25 ऑक्टोबर रोजी क्षेत्रीय अधिका-याकडे अर्ज करावे लागणार आहेत.
नवीन प्रभाग अध्यक्षांना केवळ दीड ते दोन महिन्याचा कालावधी मिळणार आहे. मागील पावणेपाच वर्षात कोणतेही पद मिळाले नसलेल्या भाजप नगरसेवकांनी किमान शेवटच्या दोन महिन्यासाठी प्रभाग अध्यक्ष हे पद मिळावे यासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. आठही प्रभाग समितीत भाजपचे वर्चस्व आहे. अध्यक्ष भाजपचे होणार हे निश्चित आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कोणाला संधी देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Discussion about this post