व्हीएसआरएस न्युज माजी केंद्रीय मंत्री आणि हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे आज दीर्घ आजारामुळे निधन
नुकतीच त्यांनी करोनाच्या आजारालाही दोन वेळा मात दिली होती. सोमवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते जिथे आज त्यांचा मृत्यू झाला. ते 87 वर्षांचे होते.
वीरभद्र सिंह यांना रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते आणि त्यांची तब्येत स्थिर होती. वीरभद्र सिंह हे 6 वेळा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री झाले आणि पाचवेळा लोकसभेवर खासदार म्हणूनही निवडून गेले होते.
तसेच त्यांनी केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या मंत्रालयांमध्येही मंत्री म्हणून काम पाहिले. इतकेच नाही, तर ते 9 वेळा राज्य विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले होते.
Discussion about this post