व्हीएसआरएस न्युज दिल्ली ः दिवंगत काॅंग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर सातव कुटुंबियांचे सांत्वन करतांना राहुल गांधी यांनी `तुम्ही काळजी करू नका, सगळा पक्ष आणि गांधी परिवार तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे`अशी ग्वाही दिली होती.
राहुल गांधी यांनी सातव कुटुंबियांना दिलेला शब्द अखेर खरा करून दाखवला आहे. राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांची काॅंग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. पज्ञा सातव यांच्या निवडीने राजीव सातव समर्थकांमध्ये आनंद पसरला असून पक्षाने दिलेला शब्द खरा करून दाखवला, अशा भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, आपल्याला मिळालेले प्रदेश उपाध्यक्षपद म्हणजे दिवंगत राजीव सातव यांच्या कामाला मिळालेली पावती असल्याची प्रतिक्रिया प्रज्ञा सातव यांनी दिली आहे. पक्षाचे आभार मानतानाच राजीव सातवजी यांनी केलेल्या कामाची पोहच पावती मला या पदाच्या रुपाने मिळाली. प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यकर्तांना सोबत घेऊन काम करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र प्रदेश काॅंग्ेसच्या वतीने राज्याची नवी कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली.
Discussion about this post