व्हीएसआरएस न्युज माेताळा : दि. १० सप्टेंबर २१ (शुक्रवार) दाेन दिवसांआधी झालेल्या मुसळधार पावसामुळे माेताळा तालुक्यात माेठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झालेले आहे. मतदारसंघाचे मा.आ.हर्षवर्धन सपकाळ यांनी आज पाहणी करुन शेतकरी बांधवांना धीर दिला.
प्रत्यक्ष बांधावर जावुन त्यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करुन शेतकरी बांधवांशी चर्चा करत त्यांच्या व्यथा एैकुन घेत ‘या संकटसमयी मी खंबीरपणे तुमच्या साेबत उभा आहे,तुम्ही अजिबात चिंता करु नका’ असे म्हणत सपकाळ यांनी शेतकरी बांधवांना धीर दिला. माेताळा तालुक्यातील अंत्री, शिरवा, किन्हाेळा, टाकळी यासह अनेक गावांना त्यांनी भेटी दिल्या. त्यावेळी त्यांच्यासमवेत माेताळा पंचायत समितीचे सभापती प्रकाश बस्सी व काँग्रेस नेते सहभागी हाेते.
हर्षवर्धनदादा सपकाळ यांनी मुसळधार पावसामुळे मतदारसंघात झालेल्या नुकसानीची माहिती ना. विजय वडेट्टीवार आणि ना. बाळासाहेब थाेरात यांना फाेनवरुन देवुन सर्वेक्षण आणि तात्काळ मदतीबाबत सकारात्मक चर्चा केलेली आहे.
Discussion about this post