व्हीएसआरएस न्युज पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष आणि माजी महापौर संजोग वाघेरे-पाटील यांचा मुलगा ऋषिकेश वाघेरे-पाटील यांचा विवाह मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
लोणावळा येथील हॉटेलमध्ये कोविड नियमांचे पालन करीत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत वाघेरे-पाटील आणि साखरे कुटुंबियांनी विवाह सोहळा आयोजित केला होता.
हिंजवडी येथील म्हाबोबा देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त यशवंत साखरे यांची कन्या स्नेहा साखरे आणि ऋषिकेश वाघेरे-पाटील यांचा विवाह मंगलमय वातावरणात संपन्न झाला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, युवा नेते पार्थ पवार, माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नगरसेवक अजित गव्हाणे, नाना काटे, मयूर कलाटे यांच्यासह सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी यांनी वधु-वरांना शुभाशीर्वाद दिले.
Discussion about this post