व्हीएसआरएस न्युज वडगाव मावळ येथून ०१ गावठी पिस्टल व ०१ जिवंत काडतुस जप्त : पुणे ग्रामीण एलसीबीची कामगिरी.
आज दिनांक ०३ /०८/२०२१ रोजी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे टिमने पोलीस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट सो. यांचे मार्गदर्शनाखाली वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीत रेकॉर्ड वरील फरार आरोपीचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीनुसार, वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीत वडगाव रेल्वे स्टेशन जवळ तलावालागत असलेल्या मोकळ्या मैदानात ता.मावळ जि.पुणे येथे संशयास्पद हालचाली वरून ताब्यात घेतलेला इसम नामे कुणाल बाबाजी हरपुढे वय १८ रा.ढोरेवाडा मोरे चौक ता.वडगाव मावळ जि.पुणे यास ताब्यात घेवून त्याचेकडून विनापरवाना व बेकायदेशीर हेतुने कमरेला बाळगलेले ०१ गावठी पिस्टल व ०१ जिवंत काडतुस एकुण किं.रु.५०,१००/- ( पन्नास हजार शंभर रुपये)चा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. सदर पिस्टल कुठून आणले याबाबत त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने सदरचा पिस्टल मध्य प्रदेश येथून विकत आणल्याचे सांगत आहे.
सदर आरोपीस वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे ताब्यात दिलेले आहे.
सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक श्री डॉ.अभिनव देशमुख सो., स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट सो. यांचे मार्गदर्शनाखाली
पो.उप निरीक्षक रामेश्वर धोंडगे
पो.हवा. प्रकाश वाघमारे ,
पोहवा मुकुंद आयचीत,
पो कॉ. प्राण येवले
पो कॉ बाळासाहेब खडके
पो कॉ.अक्षय जावळे
यांचे पथकाने केली आहे.
Discussion about this post