व्हीएसआरएस न्युज समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते.
आज दिवाळी पहिला दिवस म्हणजे गायीची पुजा करण्यासाठी कैलास कुटे यांच्या वतिने प्रभाग क्र १४ मध्ये विविध ठिकाणी पुजा कार्यक्रम ठेवण्यात आले असुण विठ्ठल मंदिर समोर कार्यलय व आदर्श मित्र मंडळ या ठिकाणी संध्याकाळी ५/८ पर्यंत या कार्यक्रमचा लाभ घ्या असे आवाहन कैलास कुटे यांनी पत्र द्वारा सांगितले .
या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते. ह्या दिवसापासून घरासमोर रांगोळी काढण्यास सुरुवात करतात. काही स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो.घरातील गाय वासरू यांना अंघोळ घातली जाते. अंगाला हळद लावली जाते, त्यांच्या अंगावर नवी वस्त्रे घातली जातात. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. भरपूर कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.
दिवशी संध्याकाळी घरातील तुळशीपुढे आणि दारात, परिसरात दिवाळी सणाच्या प्रारंभानिमित्त पणत्या लावून रोषणाई करण्याची पाढती आहे.
Discussion about this post