व्हीएसआरएस न्युज पुणे-पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ०७ जुलै रोजी वाकड पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील पोलीस हवालदार विक्रम कुदळ व प्रशांत गिलबिले यांना रावेत ते डांगे चौक या मार्गावर निळ्या रंगाची ताडपत्री असलेल्या तांबडया रंगाचा टाटा कंपनीचा एका टेम्पोमधून अवैध गुटखा आणि प्रतिबंधीत पानमसाला वाहतुक करून विक्रीसाठी नेला जात असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली.
तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी रावेत डांगे चौक रोडवर ब्लू वॉटर हॉटेल, पुनावळे पुणे येथे सापळा लावला. रात्री ११.३५ वाजण्याच्या सुमारास संशयीत टेम्पो रावेत कडून हँगींग ब्रीज ओलांडून डांगे चौकाच्या दिशेने येत असताना हॉटेल ब्लू वॉटर, पुनावळे येथे टेम्पो नं. MH18/AA/9421 ची तपासणी केली असता टेम्पोमध्ये प्रतिबंधीत विमल पानमसाल्याची १०० पोती व व्ही १ तंबाखूची १०० पोती असा माल मिळून आला. टेम्पोचे कागदपत्रांची पाहणी करता टेम्पोचा मुळ आर.टी.ओ. रजिस्ट्रेशन क्र.MH48/AY/8254 असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर टेंम्पोमधील तिघांना प्रतिबंधीत विमल पानमसाला व व्ही १ तंबाखूची तस्करी करताना मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले. या कारवाईत प्रतिबंधीत विमल पानमसाला ची १०० पोती किंमत रु. ३९ लाख ६० हजार रुपये, व्ही १ तंबाखू ची १०० पोती किंमत ४ लाख ४० हजार रुपये, एक टाटा कंपनीचा टेम्पो किंमत ८ लाख रुपये, २० हजारांचे चार मोबाईल फोन असा एकूण ५२ लाख २० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान या तिन्ही आरोपी विरुध्द वाकड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलायं. त्यानंतर आरोपींना कोर्टात हजर केले असता दि. १३ जुलै पर्यत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आला आहे.
बनावट नंबरप्लेट लावून अवैध गुटखा आणि पानमसाल्याची वाहतूक करणा-या टेम्पोसह ०३ जणांना वाकड पोलीसांनी सापळा रचून अटक केली आहे. रावेत डांगे चौक रस्त्यावर पुनावळे येथे पोलीसांनी केलेल्या कारवाईत ५२ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या कारवाईत गणेश बजी साबळे वय २९ वर्षे (टेम्पो चालक) रा. मु.पो. धोंगळे ता. साक्री, जि. धुळे, संदिप गुलाब ठाकरे (क्लिनर) वय २७ वर्ष रा. मु.पो. धोंगळे ता. साक्री, जि. धुळे, विशाल पाडूरंग लवाळे घय २२ वर्षे रा. मु.पो. उरवडे, ता. मुळशी, जि. पुणे या तिघांना पोलीसांनी अटक केली आहे.
सदरची कारवाई कृष्ण प्रकाश पोलीस आयुक्त, रामनाथ पोकळे अपर पोलीस आयुक्त, आनंद भोईटे पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, श्रीकांत डिसले सहा. पोलीस आयुक्त, वाकड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विवेक मुगळीकर वरिष्ठ पोलीस निरिक्षक वाकड पोलीस ठाणे, संतोष पाटील पोलीस निरीक्षक (गुन्हे), सुनिल टोणपे पोलीस निरीक्षक (गुन्हे २) तपास पथकातील सपोनि संतोष पाटील, पोलीस अंमलदार राजेंद्र काळे, बाबाजान इनामदार, विभीषण कन्हेरकर, विक्रम कुदळ, विजय गंभिरे, नितीन ढोरजे, बापुसाहेब धुमाळ, जावेद पठाण, प्रशांत गिलबीले, बंदु गिरे, नितीन गेंगजे, प्रमोद कदम, अतिश जाधव, सुरज सुतार, मधुकर कोळी, श्याम बाबा, कल्पेश पाटील, तुषार गाडेकर, जितेंद्र उगले, नुतन कोंडे यांनी केली आहे.
Discussion about this post