व्हीएसआरएस न्युज पुणे-पिंपरी- दि. ३ जुन २०२१( गुरुवार) ;- पुणे शहर पोलीस १९९५ बॅच, या बॅच मधील श्री नरेंद्र राजे पोलीस हवालदार सध्या कार्यरत चिखली पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड आयुक्तालय मधील यांनी सन २०१५ मध्ये व्हाटस अप ग्रुप तयार केला व ते आज तो पर्यंत बॅचच्या सहकार्यातून विविध उपक्रम म्हणजे त्यांचे बॅच मधील कोण बॅच मेट मयत झाल्यास त्यांचे कुटुंबियांना आर्थिग मदत केली जाते,
एखादा बॅच मेटला जर मोठा आजार झाला तर हे त्यास आर्थिग मदत करतात त्यातुन मागील वेळी कोल्हापुर येथे पुर आला तेव्हा नाना पाटेकर यांचे संस्थेस बॅच तर्फे एक लाखाचा चेक देण्यात आला आहे.
मागील दोन वर्षापुर्वी यांतील काही वेंचमेट यांनी एकत्र येऊन नसरापुर येथे स्वता जाऊन वक्षारोपन कार्यक्रम केला आहे आणि आता या वर्षी भरती होऊन २६ वर्ष पूर्ण झाले, परंतु यावर्षी कोरोना या महाभयंकर रोगाच्या साथीमुळे या बॅच ने वर्गनी काढून दिनांक ०१/०६/२०२१ रोजी काही बॅचमेट यांनी एकत्र येऊन कोरोनाचे गांभीर्य ठेवून सोशल डिस्टंशींग, सनीटाईज मास्क याचा वापर करुन पुण्यामध्ये विविध ठिकाणी अन्नदान वाटप,
गरजु यांना किराना धान्य किट वाटप करुन, हडपसर येथील मा. सिंधुताई सपकाळ यांचे अनाथ आश्रम हडपसर येथे जाऊन त्यांना समक्ष भेटुन बॅच तर्फे किराना धान्य वाटप करण्यात आले आहे.