व्हीएसआरएस न्युज पिंपरी -महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात आज स्थायी समितीची ऑनलाईन पध्दतीने सभा पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अॅड. नितीन लांडगे होते.
महानगरपालिकेच्या दवाखाने व रुग्णालयांसाठी बेडशिट, सोलापुरी चादर व ब्लॅकेट खरेदी करण्याकरीता येणा-या ५१ लाख ४४ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
ह प्रभागातील जलनि:सारण नलिकांची वार्षिक यांत्रिकी पध्दतीने साफसफाई करणे व चोकअप काढणे कामी येणा-या १ कोटी १९ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
इंदोर शहरातील घनकचरा व्यवस्थापन करत असुन, त्याप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरातील वार्ड क्र. ७, २८ व २९ या ठिकाणी प्रायोगिक तत्वावर घनकचरा व्यवस्थापन कामासाठी येणा-या ५६ लाख १७ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र. २० कासारवाडी येथील मनपाची प्राथमिक व माध्यमिक शाळा बांधण्याकामी येणा-या १० कोटी २२ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र. २५ वाकड येथील मनपा शाळेकरीता नव्याने वर्ग खोल्या बांधणे व आवश्यकतेनुसार इतर स्थापत्य विषयक कामे करण्याकामी येणा-या ५७ लाख ३१ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र. १० मधील नाल्यांची नाल्यांचे आर.सी.सी व सुधारणा विषयक कामे करण्यासाठी येणा-या ३१ लाख ६९ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र. ९ मासुळकर कॉलनी परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्याकामी येणा-या ४० लाख ६१ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र. ९ खराळवाडी, नेहरुनगर इत्यादी ठिकाणी स्थापत्य विषयक कामे करण्याकामी येणा-या ४३ लाख ६८ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र. ३० मधील रस्त्यांचे डांबरीकरण करण्याकामी येणा-या ३ कोटी १० लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र. ३१ मध्ये नवी सांगवी पिंपळे गुरव मिलिटरी हद्दी लगतचा रस्ता यूटीडब्लूटी पध्दतीने विकसित करण्याकरीता येणा-या ३ कोटी ६ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र. ३२ सांगवी शाळा इमारतीचे नुतनीकरणाची उर्वरित कामे करण्याकामी येणा-या २ कोटी ६१ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
दापोडी येथील पवना नदीच्या समांतर असलेला १२ मीटर रस्ता विकसित करण्याकरीता येणा-या २ कोटी १० लाख ८६ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र. ७ भोसरी मधील विविध रस्त्यांचे हॉटमिक्स पध्दतीने डांबरीकरण करण्याकामी येणा-या १ कोटी ९३ लाख २४ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र. ९ नेहरुनगर मधील स्मशानभूमी मधील विद्युत दाहिनीचे स्थापत्य विषयक आणि इतर अनुषंगिक कामे करण्याकामी येणा-या ६ कोटी २३ लाख ८८ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
Discussion about this post