व्हीएसआरएस न्युज देहु-वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्याची सेवा केली तरी भगवंताची सेवा घडते, या भावनेतून वारकऱ्यांच्या सेवेसाठी वारकरी उत्सुक असतात. दरम्यान, प्रस्थान सोहळ्याच्या महिनाभर अगोदरपासूनच ही लगबग पहायला मिळते. मात्र, यंदाही काही मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत देहूत गुरुवारी (दि. १) प्रस्थान सोहळा होत आहे.
विठुराया तुझ्या भेटीची आम्हाला आस लागलीय, लाखो वारकऱ्यांच्या जिवाची घालमेल सुरू आहे. लवकरात लवकर कोरोनाचे संकट दूर कर, असं साकडं लाखो वारकरी विठुरायाचरणी घालत आहेत. श्री क्षेत्र देहूतून तुकोबारायांचा पालखी सोहळा आज (गुरुवार दि.०१) मर्यादित वारकऱ्यांसह पंढरीकडे प्रस्थान ठेवत आहे.
३३६ वर्षापासून पायी वारीची परंपरा आजही अखंडित सुरू असून, मानकरी, सेवेकरी व ३३० दिंड्यांसह पालखी सोहळा पंढरीकडे मार्गस्थ होतो. राज्याच्या कानाकोपऱ्यांतून देहूत दाखल झालेल्या लाखो वारकऱ्यांसह १७ दिवसांच्या मुक्कामानंतर हा सोहळा पंढरपूरला पोहोचतो.
Discussion about this post