व्हीएसआरएस न्युज पिंपरी चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा श्री मोरया गोसावी जीवनगौरव पुरस्कार विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला.
सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे डॉ. प्रमोद कुबडे यांनाही सन्मानित करण्यात आले.
महासाधू श्रीमोरया गोसावी यांचा 460 वा संजीवन समाधी महोत्सव चिंचवड येथे सुरु आहे. संजीवन समाधी महोत्सवात जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमासाठी अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. एकनाथ खेडकर प्रमुख उपस्थित होते. तसेच खासदार श्रीरंग बारणे, मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, विश्वस्त विश्राम देव, हभप आनंद तांबे, ऍड. राजेंद्र उमाप, विनोद पवार, महेश पाटसकर, अतुल भंडारे, नगरसेवक मोरेश्वर शेंडगे, अपर्णा डोके, अश्विनी चिंचवडे, मंगला कदम, पोलीस अधीक्षक मिटेश भटके, पोलीस उपायुक्त शहाजी उमाप आदी उपस्थित होते.
ऋग्वेदातील सर्वोच्च पदवी मिळाल्याबद्दल विनायक रबडे यांचा गौरव करण्यात आला. विजया भालचंद्र पुरस्कार अवधूत देशपांडे, प्रल्हाद जोशी यांना मिस इंडिया या सौंदर्यवती स्पर्धेत यश मिळविल्याबद्दल पूनम महाराणा यांचा सन्मान करण्यात आला.
राजेंद्र शेलार यांनी गुणवंत कामगार पुरस्कार, तसेच धार्मिक आणि विवाह विषयक क्षेत्रातील कामाबद्दल कैलास शेलार, सामाजिक आणि पत्रकारिता जयराम सुपेकर, गणेश भक्त रुक्मिणी तारू, क्रीडा क्षेत्र आबासाहेब काळे, उद्योग क्षेत्र डॉ. सोपानराव पवार, सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्र प्रमोद कुबडे, ऍड. शिवाजी वाळके, मातृसेवाभावी संस्था सुहास गोडसे, कायदेविषयक क्षेत्र ऍड. शिवाजी वाळके, प्रभावती पडवळ, दत्तात्रय देव, संजीव पाटील, हणमंत पाटील, हभप मोरेश्वर जोशी यांना मोरया गोसावी पुरस्काराने गौरविण्यात आले.
Discussion about this post