व्हीएसआरएस न्युज पुणे-इंडिगो या विमान वाहतूक कंपनीकडून ही सेवा सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार दर सोमवारी आणि शुक्रवारी पुण्याहून अमृतसरसाठी विमान उड्डाण होईल. पुण्यातील लोहगाव विमानतळावरून २० ऑगस्टपासून अमृतसरसाठी आणि २१ ऑगस्टपासून रांची आणि तिरुअनंतपुरमसाठी विमान सेवा सुरु होईल.
तर कोल्हापूर ते नागपूर विमानसेवा देखील पुन्हा सुरु होणार आहे. याशिवाय कोल्हापूर ते अहमदाबाद ही विमानसेवाही लवकरचं सुरु होईल.
यात आठवड्यातून तीनवेळा कोल्हापूरहून अहमदाबादसाठी विमान उड्डाण होईल. या विमान सेवांसाठी ऑनलाईन बुकिंगलाही सुरुवात झाली आहे. तर नांदेड ते मुंबई उड्डाण दररोज सुरु राहणार आहे.
Discussion about this post