व्हीएसआरएस मराठी न्युज –गेल्या दोन-तीन वर्षांत वाहन इंधनांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. परिणामी नागरिक इलक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. पर्यावरण पूरक अशा या ई वाहनांची पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालात दसरा ते दिवाळी या काळात मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली असून ई वाहन नोंदणीत राज्यात द्वितीय क्रमांकाचे शहर ठरले आहे.
मात्र, शहरात सध्या महावितरणचे दुचाकीसाठी एकही सार्वजनिक ई व्हेइकल चार्जिंग स्टेशन नाही. चार्जिंग स्टेशनसाठी पिंपरी आणि भोसरी या दोन्ही विभागातून 15 अर्ज प्राप्त झाले आहेत.
महावितरणकडून पुण्यात काही महिन्यांपूर्वी ई-वाहन चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहे. मात्र, पिंपरी चिंचवडकडे अद्यापही दुर्लक्ष केले आहे. महावितरणणे पिंपरी चिंचवड शहरात प्राधान्याने दुचाकी ई व्हेइकल स्टेशनची उभारणी करावी, अशी वाहनधारकांची मागणी आहे.
पिंपरी विभागात ई-व्हेइकल चार्जिंग स्टेशनसाठी 13 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील 3 अर्जदारांना कोटेशन देण्यात आले आहे. 3 अर्जांच्या तांत्रिक बाबी तपासण्यात येत आहेत. भोसरी विभागात 2 अर्ज प्राप्त झालेले आहेत. अर्जांची छाननी करून निर्णय घेण्यात येईल.
– भारत पवार, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण.
Discussion about this post