व्हीएसआरएस मराठी न्युज आकुर्डी –निगडी दि.१५, पिंपरी चिंचवड महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना व पिंपरी चिंचवड धनुर्विद्या संघटना द्वारे आयोजित आमदार चषक १४ व्या राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धा मदनलाल धिंग्रा मैदान निगडी येथे नुकत्याच ९ ते ११ डिसेंबर दरम्यान उत्साहपूर्वक वातावरणात पार पडल्या.
स्पर्धेचे उद्घाटन पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर स्पर्धा इंडियन, रिकर्क, कम्पाउंड या तीन प्रकारामध्ये संपन्न झाल्या. या स्पर्धेसाठी ३४ जिल्ह्यातील ४00 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता .सदर स्पर्धेतून निवडलेले स्पर्धक व त्यांचे चमु यांना आंध्रप्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होता येणार आहे.
“धनुर्विद्या ही प्राचीन काळापासून भारतीय क्रीडा प्रकारात आहे मात्र हा क्रीडा प्रकार खर्चिक असल्याने इच्छा असून देखील अनेक स्पर्धकांना सहभागी होता येत नाही यासाठी यापुढे राजकीय पाठबळ देण्याची ग्वाही देत आहोत” असे आमदार अण्णा बनसोडे म्हणाले.
“पिंपरी चिंचवड शहरात स्पर्धा आयोजन केल्यामुळ शहरात हा खेळ अधिक विकसित होईल व येत्या काळात पिंपरी चिंचवड शहरातील खेळाडू देशात नाव गाजवतील असा विश्वास आहे” भारतीय धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रमोद चांदुरकर यांनी असे मत व्यक्त केले.
स्पर्धेचे मुख्य आयोजक व आंतरराष्ट्रीय खेळाडू सोनल बुंदेले यांनी लिहलेला “धनुर्विद्या” ह्या पुस्तकाचे प्रकाशन देखील यावेळी करण्यात आले.
धनुर्विद्या खेळाबाबत इत्तभूत माहिती या पुस्तकातून नवोदित खेळाडूंना मिळनार आहे. उदघाटन कार्यक्रम प्रसंगी पिंपरी चिंचवड मधील आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रथमेश फुगे, पॅरा मधील आंतरराष्ट्रीय खेळाडू अमोल बोरिवाले आणि छत्रपती पुरस्कार विजेते श्रीधर आखाडे यांचा विशेष सत्कार व सन्मान करण्यात आला.
तीन दिवसीय स्पर्धा कार्यक्रमास पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर आर एस कुमार, माजी उपमहापौर शैलजाताई मोरे, पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, महाराष्ट्राचा पहिला ऑल्मपिक खेळाडू प्रविण जाधव, ज्ञानप्रबोधिनी नवनगर विदयालयाचे प्राचार्य देवळेकर, सामाजिक कार्यकर्ते निलेश शिंदे छायावती देसले युवा उदयोजक विशाल सरवदे, पिंपरी चिंचवड जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष सुभाष मंत्री उपस्थित होते.
स्पर्धेचे बक्षिस वितरण अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, इंडियन डेन्टल असोसिएशन पिंपरी चिंचवड च्या अध्यक्ष डॉ मनीषा गरुड यांच्या व इतर मान्यवरांच्या हस्ते पार पडले.
स्पर्धेचा चा निकाल खालील प्रमाणे:
इंडियन राऊंड मुले प्रथम- आभूदय पाखले(अमरावती) द्वितीय- आयुष शिळीमकर(पुणे) तृतीय- प्रज्वल जगताप(सोलापूर)
इंडियन राऊंड मुली प्रथम- समीक्षा देशमुख(सोलापूर) द्वितीय- संस्कृति काकडे(रायगड) तृतीय- गाथा खडके(सोलापूर)
रिकर्क राऊंड मुले प्रथम- यशदीप रोकडे(अहमदनगर) द्वितीय- आदित्य पवार (सोलापूर) तृतीय- गौरव गोडसे(सातारा)
रिकर्क राऊंड मुली प्रथम- शरवरी शेंडे (पिंपरी चिंचवड) द्वितीय- वैष्णवी कुलकर्णी(नाशिक) तृतीय- शौर्य सुरवसे(पुणे)
कंपाऊंड राऊंड मुले प्रथम- जय जाधव(सोलापूर) द्वितीय- वेदान्त लंचहोडे(नागपूर) तृतीय- ओम मानकर(नागपूर)
कंपाऊंड राऊंड मुली प्रथम- वैष्णवी परदेशी(नाशिक) द्वितीय-रेनशा वाबळे(पुणे) तृतीय- स्मृति विरपे(सोलापूर)
विजेत्यांना सन्मानपूर्वक ब्राँझ सिल्व्हर व गोल्ड मेडल्स देण्यात आले.
Discussion about this post