व्हीएसआरएस मराठी न्युज -सुप्रसिद्ध ब्युटीशियन आणि समाजात आपला ठसा उमटवणाऱ्या सलमा सय्यद यांना नुकतेच मुंबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय गौरव पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट कॉस्मेटोलॉजिस्ट आणि ट्रेनर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि अन्य एका कार्यक्रमात नारी रत्न पुरस्कार 2022 ने सन्मानित करण्यात आले.
पुणे. मुंबईत हा पुरस्कार चित्रपट अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या हस्ते सलमा सय्यद यांना प्रदान करण्यात आला, तर पुण्यात हा पुरस्कार नारीरत्न पुरस्कार डॉ पद्मजा रेड्डी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सलमाच्या या यशाबद्दल शहरात सर्वत्र तिचे अभिनंदन होत असून अभिनंदनाची मालिकाही सुरू आहे.
Discussion about this post