व्हीएसआरएस मराठी न्युज –महात्मा फुले पेठेतील महात्मा फुले वाडा राष्ट्रीय स्मारक येथे सकाळी १० ते ५ यावेळेत हे अभियान राबविले जाईल.
सावित्रीबाईंच्या जयंतीचे हे १९३ वे वर्ष असून प्रत्येक वर्षीचे ३६५ दिवस याप्रमाणे एकूण ७०,४४५ दिवस पूर्ण होत असून, तेवढी रोपे नागरिकांना देण्यात येणार आहेत. यामध्ये पर्यावरण पूरक देशी वृक्षांचा म्हणजेच तुळस, पिंपळ, वावर, कडुलिंब, बहावा, दिल का राजा, भेंडी ,सिताफळ, उंबर ,आंबट चिंच, वड ,पळस टिकोमा, शिसवी, जांभूळ ,करंजी ,मोगरा आधी वृक्षप्रजातीचा समावेश आहे. याची नावनोंदणी फुले वाडा येथे सुरू होणार आहे.
अभियानाचे आयोजन रघुनाथ ढोले, रवि चौधरी, प्रल्हाद गवळी, सारंग सराफ, बाळासाहेब अमराळे, नंदा पंडीत, एकनाथ ढोले, सुनीता काळे, श्रीधर चव्हाण, चेतन धोत्रे, सचिन विप्र, डॉ. गणेश परदेशी, सुशीला नेटके, बाळासाहेब भामरे, रमेश जाधव, गणेश पाटील, विजय रजपूत यांनी केले आहे. सदर वृक्षांची लागवड व देखभाल लोकसेवा शैक्षणिक संस्था समूहाने मौजे फुलगाव तालुका हवेली जिल्हा पुणे यांनी केलेली आहे.
तसेच या समितीत सर्व संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी, सभासद, सदस्य सर्व राजकीय पक्षांचे आजी माजी पदाधिकारी, नगरसेवक व लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, सहकारी संस्था, जेष्ठ नागरीक संघ, पोलीस मित्र, महिला बचत गट, भजनी मंडळ यांचे कार्यकर्ते अभियानाकरिता काम करणार आहेत. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने रोपे घेण्याकरीता यावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
Discussion about this post