व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी:- आळंदीत काल सायंकाळी दि.१८ रोजी एक तरुण वारकरी संप्रदायातील पादचाऱ्याचा डंपर(टिप्पर)च्या धडकेने जागीच मृत्यू झाला. अमित विठ्ठलराव देशमुख (वय १९ वर्ष राहणार विठ्ठल बाबा देशमुख धर्मशाळा,वडगांव चौक आळंदी मूळ रा. लिंगा पो.रिसोड जि. वाशीम) असे अपघातात मृत पावलेल्या तरुण वारकरी विध्यार्थ्याचे नाव आहे.
आळंदीत अमित देशमुख वारकरी संप्रदायाचा अभ्यास करत होता. या धक्कादायक दुर्घटनेचे वृत्त समजताच तो राहत असलेल्या परिसरातून व आळंदीतील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
अमित हा एका खाजगी रिक्षातून वडगाव चौकात उतरून विठ्ठल बाबा देशमुख धर्मशाळेकडे पायी चालला होता. दरम्यान पाठीमागून एका भरधाव जाणाऱ्या टिप्परने (एम.एच. १२ एच.डी. ४५०६) अमितला जोरदार धडक दिली. मात्र सदर टिप्परचे चाक अमितच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी डंपरचालक हनुमंत नारायण सुरोसे (वय ४२ सध्या राहणार चोविसावाडी, चऱ्होली बुद्रुक ता. हवेली जि. पुणे. मूळ राहणार नवलबाबा वार्ड, पो. पुसद ता. पुसद, जि. यवतमाळ) यांस पोलिसांनी ताब्यात घेतले असून अटकेची प्रक्रिया सुरू आहे.
या प्रकरणी रिक्षाचालक रमेश लक्ष्मणराव रणमोडे यांनी आळंदी
पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
असे वृत्त एका वृत्तसंस्थे कडून प्रसारीत केले आहे.
अपघात झाल्या नंतर तेथील चौकात काही वेळ वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती.
Discussion about this post