व्हीएसआरएस मराठी न्युज आकुर्डी -केंद्र सरकारने एक नवीन नियम केला असून या नियमानुसार, आता मतदारांना त्यांचे आधार कार्ड आणि मतदान कार्ड एकमेकांना लिंक करणे आवश्यक आहे.
ही लिंक करण्याची जी प्रक्रिया आहेते संबंधित नागरिकांना आॕनलाईन पद्धतीने करायचे आहे.
सरकारने हा निर्णय घेण्यामागची प्रमुख कारण म्हणजे बऱ्याचदा बोगस मतदानाच्या घटना घडतात, अशा घटनांना आळा घालता यावा यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे.
या नवीन नियमानुसार 1 एप्रिल 2023 पर्यंत ज्यांची नावे निवडणूक आयोगाच्या यादीत असतील त्यांना त्यांचा आधार क्रमांक निवडणूक आयोगाला सांगावे लागणार आहे.यामुळे डबल वोटिंग सारखे प्रकार थांबायला मदत होईल.
आधार कार्डला वोटर आयडी लींक करण्याची प्रक्रिया
1- सगळ्यात अगोदर मतदारांनी https://voterportal.eci.gov.in/dashboard या संकेतस्थळावर जावे.
2- या वेबसाईटवर जा तुमच्या अगोदर अकाऊंट असेल तर लोगिन करायची गरज नाही परंतु अकाउंट नसेल तर तुम्हाला लॉग इन करण्यासाठी ‘क्रीएट अकाऊंट’ या पर्यायावर क्लिक करून नवीन अकाउंट साठी रजिस्ट्रेशन करावे लागेल.
3- या नवीन अकाउंट ची नोंदणी करण्यासाठी तुम्ही तुमचा ई मेल अथवा तुमचा वोटर आयडी किंवा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाईप करुन लॉग इन करू शकता.
4- त्यानंतर तुमच्या राज्य,तुम्ही राहात असलेला जिल्हा आणि इतर आवश्यक माहिती भरावी. यानंतर सर्च या बटनावर क्लिक करून इतर डेटा समाविष्ट करून ‘फिड आधार नंबर’ वर क्लिक करावे. यानंतर सबमिट वर क्लिक करून आधार आणि वोटर आयडी लींक करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.
कैलास कुटे यांच्या जनसंपर्क कार्यलयत विठ्ठल मंदिरासमोर विठ्ठलवाडी येथे जमा करावे..जनसंपर्क कार्यालयामध्ये आपले वोटिंग कार्ड आधार कार्ड ला लिंक करण्यासाठी संपर्क साधावा असे कुटे यांनीआवहन केले आहे.
Discussion about this post