व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी दि.६ – पिंपरी चिंचवडच्या औद्योगिक क्रांती दरम्यान नावाजलेले, झुंजार कामगार नेते ज्यांनी मालकवर्गाच्या शोषण प्रवर्तीला झोपविले आणि कामगारांना संघटन, संप ,आंदोलने मोर्चे या माध्यमातून त्यांना त्यांचे हक्क मिळवून दिले. प्रसंगी चने, फुटाणे खाऊन अविवाहित राहून पिंपरी चिंचवड शहरातील कामगारांसाठी बलिदान देऊन शहर जिल्ह्यातील कामगारांना आत्मबळ दिले त्यातुन कामगारांची एक पिढी निर्माण झाली असे मत कामगार नेते काशिनाथ नखाते आणि व्यक्त केले.
कष्टकरी संघर्ष महासंघ तर्फे आज दादा रूपमय चटर्जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी व्यंकटराव आव्हाड, ओमप्रकाश मोरया,सलीम डांगे,
बालाजी बिराजदार,
माधुरी जलमुलवार,
बालाजी लोखंडे, यासीन शेख उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहर परिसरातील १०० पेक्षा अधिक कंपन्यात कामगार संघटना बांधून सुद्धा कधीही अतिताईपणा न करता मोठेपणा न मानता साधी राहणीमान , उच्च विचार, निस्वार्थी जीवन नेहमी कामगार हिताचे विचार करणारे आणि कायद्याचा परिपूर्ण अभ्यास असणारे असे कामगार नेते होऊन गेले अमिनेशन फॅक्टरी, बजाज ऑटो, बजाज टेम्पो ,बकाऊउल्फ, अल्फालवाल, सँडविक एशिया, थरमॅक्स,महिंद्रा सिंटर्ड, स्वास्तिक रबर आशा कंपन्यांमध्ये त्यांनी यशस्वी वेतन करार केले व कामगारांचे हक्क दिले एका साध्या खोलीमध्ये राहून सायकल किंवा सार्वजनिक परिवहन बसने ते प्रवास करायचे पिंपरी चिंचवड शहरातील कामगारांसाठी त्यांनी दिलेले य योगदान हे श्रमिक कामगार कधीही विसरणार नाहीत असे मत नखाते यानी व्यक्त केले.
Discussion about this post