व्हीएसआरएस मराठी न्युज मावळ-पवन मावळातील कोथूर्णे गावातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या करण्यात आली. यावेळी कामशेत पोलिसांनी तपासाची सुत्रे हलवत 24 तासाच्या आत आरोपीला बेड्या ठोकल्या.
याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी मंगळवार (दि.2) कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पुणे ग्रामीण पोलीस दलाचे अपर पोलीस अधीक्षक मिलिंद लालासाहेब मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी ( दि. 2) दुपारी 3.30 च्या सुमारास कामशेत पोलीस ठाण्यामध्ये कोथूर्णे येथील अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता कामशेत पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवत 24 तासाच्या आत आरोपी तेजस उर्फ दादा महिपती दळवी (वय 24 वर्षे कोथूर्णे ता. मावळ) याला मोठ्या शिताफीने अटक केली. आरोपी तेजसने गुन्हा कबूल केला असून त्याच्यावर पोस्को 363, 302 या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास कामशेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप करत आहेत.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी दुर्गा श्वान याचाही वापर मुलीला शोधण्यासाठी करण्यात आला.
सदर गुन्ह्याच्या शोधामध्ये पोलीस निरीक्षक संजय जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाश पवार, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, गणेश तावरे, सहाय्यक फौजदार प्रकाश वाघमारे, शब्बीर पठाण, पोलीस हवालदार हनुमंत पासलकर, प्रमोद नवले, समाधान नाईकनवरे प्राण येवले, समीर शेख, जितेंद्र दीक्षित, सागर बनसोडे, अनिल हिप्परकर, नितीन कळसाईत, आशिष झगडे, रवींद्र राऊळ, होमगार्ड प्रशांत कटके, किसन बोंबले आदींच्या पथकाने भाग घेतला होता.
Discussion about this post